समुद्रा......
मला तुझ्याकडे यायला आवडते,
कारण तुझ्यात अन माझ्यात बरेच साम्य आहे.
तू जसा आहेस - अशांत, अथांग,गहिरा आणि सर्वांमध्ये एकटा;
तसाच मीही आहे थोडाफार - चंचल, स्थिरगंभीर, खोळ आणि गराड्यात एकटा.
तू जसा सामावून घेतोस लोकांनी टाकलेला कचरा, त्यांची घाण आणि प्रदूषण;
तसाच मीही सहन करतो आरोप, टोमणे आणि दुषित विचार.
पण आपले साम्य इथेच संपते मित्रा. तुझ्या रागाने त्सुनामी येते अन क्षणात तांडव होतो.
माझ्या रागाने मी पांडवातला कर्ण होतो.
तुझ्या निरंतर प्रयत्नाने तू पर्वत, दगड सर्व वितळवतो.
मी आयुष्यभर हे परीक्षेचं कोडेच सोडवतोय.
तुला भेटायला येतात सरिता, शैलजा, मेघा भरभरून प्रेम घेऊन.
मला भेटायला येतात धक्के, टोनपे आणि अडथळे माझी लायकी द्यायला दाखवून.
कधीतरी मला तुझ्या कवेत घे,कारण तुझ्या लाटांच्या स्वरात मला मायेची उब जाणवते,
आणि अलगद तुझ्या काळजातली भरारी घेण्याची धग दे.
समुद्रा, मला तुझ्याकडे यायला आवडते.
No comments:
Post a Comment