Wednesday, June 6, 2018

आर्जव



कधी फिराल या वारीत तर दिसेल अखंड मराठी गाव;
रूप, रंग, बोली जरी वेगळी तरी सर्वांमुखी त्या माऊलीचेच नाव.



निरखून ऐकाल या जनांचे कीर्तन, तर ऐकू येतील बहू आवर्तन;
काहींच्या गोष्टी भिडते अतरंगी, तर काहींच्या नुसत्याच सांगोपांगी.



कोणाच्या गोष्टीमध्ये आहे मायेची विचारपूस; तर कोणाच्या मनामध्ये आहे फक्त धुसफूस.



कोणी विचारत आहे, होईल का माझे लेकरू यंदा तरी पास?;
तर कोणाच्या नेत्री आहे पावसाची आस.



कोणी आले आहे सोबत आपल्या नातवंडांना घेऊन;
तर कोणी आले आहे आपल्या मालकाचे मढे नुकतेच पोहोचवून.


कोणी मागत आहे सुख,शांती आणि समाधान;
तर कोणी  आळवत आहे मोक्ष, मुक्ती, वैकुंठाचे दान.


सर्वांच्या वदनी आहे माऊली हेच नाव;
पण प्रत्येकाच्या नयनात आहे एकच भाव, माऊली आता तरी पाव, आता तरी पाव.

No comments:

Post a Comment