Monday, June 18, 2018

समुद्रा...


समुद्रा......
मला तुझ्याकडे यायला आवडते,
कारण तुझ्यात अन माझ्यात बरेच साम्य आहे.


तू जसा आहेस - अशांत, अथांग,गहिरा आणि सर्वांमध्ये एकटा;
तसाच मीही आहे थोडाफार - चंचल, स्थिरगंभीर, खोळ आणि गराड्यात एकटा.

तू जसा सामावून घेतोस लोकांनी टाकलेला कचरा, त्यांची घाण आणि प्रदूषण;
तसाच मीही सहन करतो आरोप, टोमणे आणि दुषित विचार.

पण आपले साम्य इथेच संपते मित्रा. तुझ्या रागाने त्सुनामी येते अन क्षणात तांडव होतो.
माझ्या रागाने मी पांडवातला कर्ण होतो.

तुझ्या निरंतर प्रयत्नाने तू पर्वत, दगड सर्व वितळवतो.
मी आयुष्यभर हे परीक्षेचं कोडेच सोडवतोय.

तुला भेटायला येतात सरिता, शैलजा, मेघा भरभरून प्रेम घेऊन.
मला भेटायला येतात धक्के, टोनपे आणि अडथळे माझी लायकी द्यायला दाखवून.

कधीतरी मला तुझ्या कवेत घे,कारण तुझ्या लाटांच्या स्वरात मला मायेची उब जाणवते,
आणि अलगद तुझ्या काळजातली भरारी घेण्याची धग दे.

समुद्रा, मला तुझ्याकडे यायला आवडते.

Wednesday, June 6, 2018

आर्जव



कधी फिराल या वारीत तर दिसेल अखंड मराठी गाव;
रूप, रंग, बोली जरी वेगळी तरी सर्वांमुखी त्या माऊलीचेच नाव.



निरखून ऐकाल या जनांचे कीर्तन, तर ऐकू येतील बहू आवर्तन;
काहींच्या गोष्टी भिडते अतरंगी, तर काहींच्या नुसत्याच सांगोपांगी.



कोणाच्या गोष्टीमध्ये आहे मायेची विचारपूस; तर कोणाच्या मनामध्ये आहे फक्त धुसफूस.



कोणी विचारत आहे, होईल का माझे लेकरू यंदा तरी पास?;
तर कोणाच्या नेत्री आहे पावसाची आस.



कोणी आले आहे सोबत आपल्या नातवंडांना घेऊन;
तर कोणी आले आहे आपल्या मालकाचे मढे नुकतेच पोहोचवून.


कोणी मागत आहे सुख,शांती आणि समाधान;
तर कोणी  आळवत आहे मोक्ष, मुक्ती, वैकुंठाचे दान.


सर्वांच्या वदनी आहे माऊली हेच नाव;
पण प्रत्येकाच्या नयनात आहे एकच भाव, माऊली आता तरी पाव, आता तरी पाव.

Monday, June 4, 2018


TIP: ही कविता कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित नाही. एका कवीने कवीमनाने लिहिली आहे.


Tragedy



लईच भारी tragedy आहे माझ्या आयुष्याची गडे.

मला जी आवडते तिला मी आवडतो.
आवडतो म्हणजे आवडतो, पण तसा नाही आवडत.

तसा नाही म्हणजे कसा नाही?
तर फिरवायला मी आवडतो, गप्पा मारायला मी आवडतो, रडल्यावर खांदा म्हणून मीच लागतो. पण तसा नाही आवडत.

तसा म्हणजे कसा? तर स्वप्नातल्या त्या राजकुमारसारखा. हो तोच तो! उंच, गोरा, सुंदर सिनेमातल्या हिरो सारखा.

हा राजकुमार पण लई भारी आहे. 2-4 वेळा भेटतो, रुबाबात बोलतो, गाडीघोड्यातून फिरवितो आणि आमचं footage खाऊन जातो.


आम्ही असतो तिथेच जवळपास. उकिरड्यावरच्या शिळक्या भाकऱ्या खात. आम्ही राजकुमार का नाही याचा विचार करत आणि विचारात डोक्याचा भुगा करत.

 आम्ही पण शपथ घेतो, की यापुढे आपण प्रेम करायचा नाही. आपल्या लायकीत राहायचा. पण प्रेमाचा दुःख बघवत नाही आणि आमच्या डोक्यातून त्यांचा नाद सुटत नाही.. लईच tragedy आहे गडे आपल्या life ची...

Sunday, January 28, 2018

बघ माझी आठवण येते का


TIP: ही कविता कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित नाही. पुण्यातील स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मित्र-मैत्रिणींना बघून सुचली आहे.

सकाळी उठुन लायब्ररीत ये, आपल्या नेहमीच्या जागेवर बस.
पुस्तक उघडून जेव्हा समोर बघशील..., बघ माझी आठवण येते का?


एका रम्य संध्याकाळी ओंकारेश्वरच्या पुलावर जा, सूर्य आकाशात रंगांची उधळण करत असेल.
मावळतीच्या दिशेला, आभाळात बघताना..., बघ माझी आठवण येते का?

रात्री गप्पांच्या ओघात, वारा तुझी एक बट अलगद उलगडेल आणि गोड हसत ती बट तू  मागे सारशील... बघ माझी आठवण येते का?

ओल्या चिंब पावसात, रात्रीच्या गडद अंधारात, तुझ्या प्रिय व्यक्तीबरोबर आईस्क्रीम खाताना.
जेव्हा शेवटच्या बदामावर रणकंदन माजेल, बघ माझी आठवण येते का?

 मला माहिती आहे की तुला माझी आठवण कधीच येणार नाही,आणि आली तरी तू दाखवणार नाहीस.
कारण.... आपले नाते माझ्यासाठी मैत्रीच्या पलीकडे होते आणि तुझ्यासाठी व्यवहाराच्या अलीकडे होते.

शोध प्रेमाचा

झुरलो आहे या मैत्रीत, आतां प्रेम हवे आहे,
मित्रांच्या या जगात, माझ्या हक्काची प्रेयसी शोधत आहे.

पुरे झाली तुझी साथ, आता सहवास हवा आहे,
या गुलाबी थंडीत तुझा हात हातात हवा आहे.

तुझ्या डोळ्यांतीळ काजळाला दुरून बराच बघितले आहे,
आता त्या कोमल पापण्यांना , ओठांनी माझ्या शिवायचे आहे.

भरपूर वाचले whatsApp mesages, आता तुझे डोळे वाचायचे आहेत,
तुझ्या त्या गालावरच्या खळीत, स्वतःला हरवून शोधायचे आहे.

polity, economics आणि history चे discussion आता फार झाले,
प्रेमाच्या chemistry चे आता प्रॅक्टिकल करायचे आहे.

तुझा हात हातात घेऊन,भरपूर मला फिरायचे आहे,
तुझ्या ओठातले दाणे अलगद मला वेचायचे आहेत.
मैत्रीच्या या गर्दीत माझ्या हक्काचे माणूस मला शोधायचे आहे.....


TIP: ही कविता कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित नाही. माझ्या काही friendzone झालेल्या मित्रांची व्यथा आहे.