TIP: ही कविता कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंधित नाही. पुण्यातील स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मित्र-मैत्रिणींना बघून सुचली आहे.
सकाळी उठुन लायब्ररीत ये, आपल्या नेहमीच्या जागेवर बस.
पुस्तक उघडून जेव्हा समोर बघशील..., बघ माझी आठवण येते का?
एका रम्य संध्याकाळी ओंकारेश्वरच्या पुलावर जा, सूर्य आकाशात रंगांची उधळण करत असेल.
मावळतीच्या दिशेला, आभाळात बघताना..., बघ माझी आठवण येते का?
रात्री गप्पांच्या ओघात, वारा तुझी एक बट अलगद उलगडेल आणि गोड हसत ती बट तू मागे सारशील... बघ माझी आठवण येते का?
ओल्या चिंब पावसात, रात्रीच्या गडद अंधारात, तुझ्या प्रिय व्यक्तीबरोबर आईस्क्रीम खाताना.
जेव्हा शेवटच्या बदामावर रणकंदन माजेल, बघ माझी आठवण येते का?
मला माहिती आहे की तुला माझी आठवण कधीच येणार नाही,आणि आली तरी तू दाखवणार नाहीस.
कारण.... आपले नाते माझ्यासाठी मैत्रीच्या पलीकडे होते आणि तुझ्यासाठी व्यवहाराच्या अलीकडे होते.